फुलेंच्या निर्वाण प्रसंगाने गहिवरले प्रेक्षक
अमरावती जिल्हयातीत अंजनगाव सुजी येथे नाट्यलेखिका अपूर्वा सोनार लिखित सामाजिक व परिस्थितीवर आधारित संघर्षमय ऐतिहासिक नाटक, ‘ज्योतीबांची सावली… सावित्री माऊली’ या नाटकाचा ४९ वा नाट्यप्रयोग १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ठाकरे सभागृह, सुर्जी अंजनगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रभावी नाट्यप्रयोगाला शहरातील हजारोंचा संख्येने उपस्थित नागरिक, महिला, शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकातील फुलेंच्या निर्वाणाचा प्रसंग पाहून प्रेक्षक गहिवरले होते
नाट्यप्रयोगाचे उद्घाटन उद्योजक व माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे यांच्याहस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावरप्रमुख अतिथी डॉ. विलास कविटकर, डॉ. श्रीकृष्ण गोरडे, डॉ. मोहन काळे, सतीश लोणकर, गणेश पिंगे, प्रकाश चांडक, सतीश हंतोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख
पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नाट्यप्रयोगाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल जुनघरे व पंकज वर्हेकर, जावरकर मॅडम यांचा जेसीआयतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे भूमिका सत्यशोधक लेखक जयकुमार चर्जनसर यांनी तर क्रांतिज्योती सावित्रीआई फुलेंची भूमिका अभिनेत्री अपूर्वा सोनार यांनी साकारली.
या नाट्यप्रयोगाचे संयोजन व आयोजन जेसीआय अध्यक्ष अमोल रसे, सचिव वासुदेव काळे, प्रकाश चांडक, जयेश ढोकणे, अमोल वर्हेकर, विशाल भेलांडे, चंदु गुलवाडे, श्रीकृष्ण गोरडे, प्रविण बेलसरे, नांदूरकर व निलेश हाडोळे यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाचे संचालन विशाल भेलांडे यांनी, तर आभार वासुदेवराव काळे यांनी मानले.
Box :-
‘ जोतिबाची सावली… सावित्री माऊली ‘ नाटकाची गरुडझेप
जगभरातील २४ देशात कार्यरत असलेल्या J C I सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने आमचा नाट्य प्रयोग घेतला होता . प्रयोगाला उपस्थित असतेला बुद्धीजिवी वर्ग आणि विवेकी प्रेक्षकांच्या समोर जोतिबांची भूमिका साकरणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता . राष्ट्रपिता जोतीराव फुलेंसारखा क्रांतिदर्श महात्मा रंगभूमीवर का होईना पण मला साकारायला मिळणे यापेक्षा माझ्यासाठी खरतर आनंदपर्वणीच म्हणावी लागेल . सोबतचच्या सर्वच सहकलाकारांनी आपापली भूमिका जिवंत करून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली हे त्यांनी संवादाला दिलेल्या टाळ्यांतून दिसून आले. या नाटकाचे यवतमाळात ३४ तर अमरावती जिल्हा व इतर मिळून १६ असे ४९ प्रयोग सादर झाले लवकरच ‘ जोतिबाची सावली…’ आपला सुवर्ण महोत्सवी प्रयोग सादर करणार आहे. फुले दाम्पत्यांचे विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविणे हेच आमचे अंतिम लक्ष आहे .
- जयकुमार चर्जन










