चांदुर बाजार व मोर्शी संघांची तालुका बाजी.
चांदुर बाजार/प्रतिनिधी :- जिल्हास्तरीय शालेय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन अमरावती टेनिस हॉलीबॉल असोसिएशन व गो सी टोम्पे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चांदुर बाजार येथे संपन्न झाल्या यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन गो सी टोम्पे महाविद्यालय चे उपप्राचार्य डॉ नंदकिशोर गव्हाळे,जिल्हा असोसिएशन चे सचिव डॉ तुषार देशमुख, तालुका शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्ष नविन दंडाळे, तालुका क्रीडा संयोजक पंकज उईके,प्रवीण पारधी, प्रा डॉ प्रवीण इंगळे,आशिष पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते, यावेळी 14 वर्ष गटात बालमुकुंद राठी विद्यालय शिरजगाव कसबा व इंडो पब्लिक स्कुल अमरावती 17 वर्ष गटात शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी व भाऊसाहेब सोनार विद्यालय करजगांव 19 वर्ष दोन्ही गटात शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी विजयी झाले तर मनपा विभागात मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय अमरावती चा संघ 14 व 17 वर्ष गटात विजयी झाला पहिल्याच वर्षी सहभागी झालेला शंकर विद्यालय तळवेल चा संघ दोन गटात उपविजयी झाला. आयोजनासाठी सर्वेश ठाकरे, सर्वेश चौधरी, पियुष झोलेकर, हर्षल पारिसे रुद्र काळे व शिवाजीयंस स्पोर्ट क्लब च्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.












