राज्यस्तरीय जुनिअर डॉजबॉल स्पर्धेसाठी अमरावती जिल्हा संघाची निवड!! …………पालघर येथे राज्यस्पर्धेचे आयोजन राज्यस्तरीय जुनिअर डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन डहाणू जिल्हा पालघर येथे येत्या 9 ते 11 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या करिता अमरावती जिल्हा संघ निवड चाचणी नुकतीच चांदुर बाजार येथे संपन्न झाली. यामध्यें जिल्ह्यातील विविध खेळाडूंची निवड जिल्हा संघात करण्यात आली. यामध्यें शंकर विद्यालय तळवेल च्या सहा विद्यार्थी यांची निवड करण्यात आली. यामध्यें अनिरुद्ध मालवे,फरदिन शहा, कृष्णल मोहोड, आर्यन गेडाम,दीपक चढोकार, प्रेम लहाने यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जी आर काबरा विद्यालयाचा विद्यार्थी हर्षल पारिसे, ऑरेंज लाईन स्कुल चा पियुष झोलेकर, शिवाजी हायस्कुल शि.बंड चा विद्यार्थी यश कोचे,जगदंब स्कुल चे सोहम ठाकरे,सक्षम राऊत तर अमरावती येथील रामकृष्ण क्रीडा विद्यालयाचा विद्यार्थी संभाजी सांगोले यांचा समावेश आहे.याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,सचिव नरेंद्रराव देशमुख, राज्य डॉजबॉल संघटनेचे सचिव डॉ हनुमंत लुंगे, डॉ सुगंध बंड,जगदंब स्कुल चे अध्यक्ष विनोद कोरडे,जी.आर काबरा संस्थेचे अध्यक्ष राम काबरा यांच्यासोबत मुख्याध्यापक रेखा परिहार,भाष्कर काळे, कीर्ती ठाकरे,पंकज उईके,प्रवीण मोहोड, महेश भुले आदिनी अभिनंदन केले आहे.













