….3 वर्षात 100 च्या वर राज्यस्तरावर व 8 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकले.
चांदुर बाजार येथील क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असे क्रीडा मंडळ म्हणुन शिवाजीयंस स्पोर्ट्स क्लब नावलौकिकास येत आहे. गेल्या 3 वर्षात या मंडळाने क्रीडा क्षेत्रात धमाका केला असून विविध क्रीडा प्रकारात या मंडळाचे विविध खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. या क्लब ची स्थापना तळवेल येथील सुप्रसिद्ध शेषस्मृती क्रीडा मंडळाच्या पासून प्रेरणा घेऊन 19 फेब्रुवारी 2018 ला डॉ तुषार देशमुख यांनी सहकाऱ्यांना घेऊन केली.सुरुवातीला हे मंडळ फक्त फुटबॉल ह्या खेळात अग्रेसर होते.या मंडळाचे दोन खेळाडू राज्य स्तरावर पहिल्यांदा फुटबॉल मध्ये सहभागी झाले.त्यानंतर 3 खेळाडूंनी फुटबॉल मध्ये अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मंडळाच्या माध्यमातूनच अचलपूर फुटबॉल असोसिएशन ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या मंडळाने फुटबॉल सोबतच सेपक टकरा हा नवीन खेळ शिकून त्यात प्रविण्य मिळवणारे विद्यार्थी तयार केले. एकट्या सेपक टकरा या खेळात मंडळाचे 60 च्या वर खेळाडू राज्य व दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळून आले आहेत. सेपक टकरा सोबतच मंडळाने टेनिस हॉलीबॉल, बॉल बॅडमिंटन, पेसापाल्लो, डॉजबॉल हे खेळ सुद्धा सुरु केले आहेत या खेळतहीं 40 च्या वर खेळाडू राज्यस्तरावर व 6 विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. या मंडळाचा सराव हा गो सी टोम्पे महाविद्यालयाच्या मैदानावर नियमित होतो. याकरिता संस्थेचे अध्यक्ष व मंडळाचे मार्गदर्शक भाष्कर दादा टोम्पे, प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके यांचे कायम मार्गदर्शन सहकार्य मिळते. या मंडळाला श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे.त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातले भीष्मपितामह डॉ हनुमंत लुंगे सर यांचे विशेष मार्गदर्शन आहे.त्याचप्रमाणे विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी असणारे क्रीडा भूषण डॉ सुगंध बंडसर, मंडळाचे सदस्य पंकज उईके, डी आर नांदूरकर, बबलू उर्फ नरेंद्र देशमुख, प्रवीण पारधी तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नवीन दंडाळे,प्रवीण मोहोड,किरण सोनार,सुधीर राहाटे,राजेश वानखडे,मनिष नागले, शैलेश गावंडे,प्रिया देशमुख, प्रतीक देशमुख,सचिन किटूकले सुयोग गोरले,विशाल पाटील ,अंकित हरडे आदींचे सहकार्य वेळोवेळी मंडळाला मिळत असते. जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब खडके,सचिव नितीन चव्हाळे यांनाही मंडळाच्या कार्याबद्दल अभिमान आहे.या मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच प्रार्थना.

















