नुकताच जिल्हा व विभागस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यामध्यें तळवेल येथील शंकर विद्यालयाचे शिक्षक व उपक्रशील व्यक्तिमत्व डॉ तुषार देशमुख ठाकूर यांच्या उपक्रमाला पाचवा क्रमांक मिळाला असून त्यांचा उपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. डॉ तुषार देशमुख यांचा उपक्रम क्रीडा व गणित या विषयावर आधारित होता.पहिल्या फेरीत यश मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये उत्तम सादरीकरण झाल्याने त्यांचा उपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे या आधीही डॉ तुषार देशमुख यांच्या विविध उपक्रमांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.त्यांचे क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य आहे.ते विविध सामाजिक संघटना व क्रीडा संघटनेचे पदाधिकारी आहेत या यशाबद्दल त्यांचे श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,सचिव नरेंद्रराव देशमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ मिलिंद कुबडे सर, अधिव्याख्याते डॉ विजय शिंदे सर, गटशिक्षणाअधिकारी व शिक्षण विभाग चांदुर बाजार, शंकर विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.












