चाकूर : फेसबुक पोस्टद्वारे पोलिसांची बदनामी करण्याचा प्रकार चाकूर येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात घडला होता. याप्रकरणी शुक्रवारी (दि.७) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,चाकूर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांबाबत बदनामीकारक वक्तव्य करून फेसबूकच्या माध्यमातून ती पोस्ट व्हायरल केली होती. हा प्रकार बुधवारी (दि.५) ३.३० च्या सुमारास घडला होता. पोलीस ठाण्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित आकाश मोहनराव मोठेराव (रा.चाकूर) आणि एक अनोळखी व्यक्ती (वय २५ ते ३० वर्षे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
