चांदुर बाजारात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत व्यक्त्यांच्या भावना
******************
चांदुर बाजार/प्रतिनिधी :-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली आहे.एक वक्ताशीर,कार्यकुशल, संघटक नेता आपण गमावला अशा प्रतिक्रिया उपस्थित सर्वच नेत्यांनी व्यक्त केल्या. यावेळी श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते रमेशभाऊ देशमुख होते. माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती मध्ये चांदुर बाजार च्या नगराध्यक्षा मनीषा नांगलिया, गो सी टोम्पे महाविद्यालय ट्रस्ट चे अध्यक्ष भाष्कर दादा टोम्पे, खरेदी विक्री चे संचालक साहेबराव पोहोकार, राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब खडके, भारतीय कॉम्युनिस्ट पक्षाचे पंकज काका आवारे,भाजपा चे तालुका अध्यक्ष रमेश तायवाडे,जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकोडे,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष किशोर देशमुख, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष दिनेश आमझरे,राज्य संपर्कप्रमुख संतोष किटूकले,घनश्याम पेठे,महिला आघाडी च्या स्टेला जवंजाळ, शिवसेना उबाठा चे तालुका अध्यक्ष शैलेश पांडे,राष्ट्रवादी महिला आघाडी च्या सारिका बर्वे, वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष सचिन वानखडे,सुरज चव्हाण बहुजन मुक्ती पार्टी चे अध्यक्ष गौरव किटूकले चांदुर बाजार नगर परिषद चे नगरसेवक एजाज खान, मनीष नांगलिया,नरेंद्र वानखडे,सचिन खुळे,नाजीम प्रिन्स, सौं कल्याणी कोंडे,ऍड आबीद हुसेन,अजय मालिये, घनश्याम उसरबरसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार चे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब खडके व युवा नेते डॉ तुषार देशमुख यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तुषार देशमुख, प्रास्तविक बाळासाहेब खडके यांनी केले तर निखिल काटोलकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.सभेला पूर्ण तालुक्यातून युवक व जेष्ठ मंडळी उपस्थित होती.


















