आज दादांचा वाढदिवस,भाष्कर दादा एक आगळ वेगळं व्यक्तिमत्व आहे.आपल्या संस्थेतील विद्यार्थी मोठा व्हावा यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात.वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यात देशभक्ती,समाजसेवा,वैज्ञानिक दृष्टीकोन निर्मिती,इतिहास आवड आदी निर्माण व्हावी यासाठी आग्रही असतात. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली संस्था त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मोठी केली.कला वाणिज्य विज्ञान या सोबत शिक्षण महाविद्यालय व मागील वर्षीपासून फार्मसी कॉलेज ही सुरु केले. यामागे हाच दृष्टीकोन आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी पुढे जावा त्याला काही अडचण येऊ नये, तो स्वतः च्या पायावर उभा व्हावा. दादांचं क्रीडा क्षेत्रावर नितांत प्रेम आहे.त्यामुळेच ते कायम क्रीडा साठी प्रयत्नशील असतात.संस्थेचे अनेक विद्यार्थी विद्यापीठ व राष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात आमचं शिवाजीयंस स्पोर्ट्स क्लब कार्य करते,क्लब चे अनेक विद्यार्थी राज्य राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावर खेळत आहेत. संत नामदेव महाराज यांच्यावर दादांची निष्ठा आहे.नामदेवांचा विचार घेऊन ते देशभर भ्रमणती करतात.श्री नामदेव क्षत्रिय समाजाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अशा सर्वसमावेशक व्यक्तिमत्वला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
डॉ तुषार देशमुख तळवेलकर











