जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत चांदुर बाजार दर्यापूर अचलपूर अंजनगाव संघाची बाजी.
तळवेल/प्रतिनिधी :- शंकर विद्यालय तळवेल येथे दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या भव्यदिव्य आणि अविस्मरणीय आयोजित जिल्हास्तरीय शालेय खो -खो उदघाटनकार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख ( अध्यक्ष बाबाराव बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल )यांनी भूषविले तसेच उद्घाटक म्हणून माननीय श्री अशोक जी जाधव पोलीस निरीक्षक चांदूरबाजार, प्रमुख उपस्थितीकॅप्टन नंदकिशोर चौधरी( निवृत्त एअर फोर्स अधिकारी) यांनी भूषविले तसेचकार्यक्रमाला नरेंद्रराव देशमुख( सचिव श्री बाबाराव शिक्षण संस्था तळवेल) रविराज देशमुख (सहसचिव श्री बाबाराव शिक्षण संस्था तळवेल)बबलू देशमुख (सदस्य शारीरिक शिक्षक संघटना अमरावती) वैकुंठरावजी वानखडे (उपाध्यक्ष शेषस्मृती क्रीडा मंडळ तळवेल) निर्मिती पब्लिक स्कुल चे मुख्याध्यापक तुषार खोंड, शंकर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाष्कर काळे तसेच चांदूरबाजार तालुका शारीरिक शिक्षक संघटनाचे संयोजक पंकज उईके सनवीन दंडाळे ( अध्यक्ष शारीरिक शिक्षक संघटना चांदूरबाजार, डी आर. नांदुरकर सर ( सल्लागार तालुका शारीरिक शिक्षक संघटना ) शैलेशजी गावंडे ( राष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शक चांदूरबाजार) शसुयोग गोरले सर ( क्रीडा पत्रकार चांदूरबाजार, माननीय श्री मनीष नागले सर ( सहसचिव शारीरिक शिक्षक संघटना चांदूरबाजार). यांची विशेष उपस्थिती होती.समारोपीय कार्यक्रमात माननीय श्री नितीन चव्हाळे सर ( शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खो-खो खेळाडू )यांनी भूषविले. या स्पर्धेप्रसंगी त्यांनी आयोजकांचे कौतुक केले तसेच तळवेल मधील या स्पर्धा म्हणजे सर्व आदर्श स्पर्धा असल्याचे सांगितले.सर्व खेळाडूंना खेळाचे महत्व आणि त्यामधून विविध शासकीय पदावर खेळाच्या माध्यमातून नोकरीत कश्या प्रकारे संधी मिळतात याबद्दल विशेष मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा संयोजक डॉ. तुषार देशमुख (सचिव शारीरिक शिक्षक संघटना चांदूरबाजार ) यांनी केले. आभार प्रिया देशमुख यांनी मानले.शंकर विद्यालय तळवेल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय खो -खो क्रीडा स्पर्धेत 14,17 आणि 19 वर्षाखालील ( मुले ) वयोगटात 14 वर्षाखालील विजेता संघ : शंकर विद्यालय तळवेल( चांदूरबाजार ) उपविजेता संघ : खल्लार विद्यालय ( दर्यापूर )
17 वर्षाखालील विजेता संघ : आदर्श विद्यालय जवळा शहापूर ( चांदूरबाजार तालुका )
उपविजेता संघ अचलपूर तालुका
19 वर्षाखालील विजेता संघ : खल्लार विद्यालय खल्लार ( दर्यापूर तालुका )
उपविजयी संघ (अचलपूर तालुका )14,17 आणि 19 वर्षाखालील ( मुली ) वयोगटात 14 वर्षाखालील विजेता संघ : आदर्श विद्यालय भुगाव ( अचलपूर तालुका) उपविजेता संघ : खल्लार विद्यालय ( दर्यापूर तालुका )
17 वर्षाखालील विजेता संघ : आदर्श विद्यालय भुगाव ( अचलपूर तालुका )
उपविजेता संघ प्रश्नचिन्ह आश्रम शाळा( नांदगाव खंडेश्वर तालुका )
19 वर्षाखालील विजेता संघ : सीताबाई संगई कन्या विद्यालय ( अंजनगाव तालुका )उपविजेता संघ : बी. डी.एस.(चांदुर रेल्वे तालुका ) कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर विद्यालय व शेषस्मृती क्रीडा मंडळाच्या कर्मचारी तथा खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.











