तारुण्य जगण्याची एक किमया असते .डॉ तुषार देशमुख तरुणाईचा असाच किमयागार !
माझी सात – आठ वर्षांपूर्वी ओळख झाली .
केशवराव ठाकरे आयोजित करित असलेल्या प्रबोधन कार्यक्रमतली ती ओळख ! मराठा सेवा संघाच्या वैचारिक तालमीतले सर्व अस्त्र – शस्त्र त्याच्याकडे आहेत . पहिल्याच भेटीत ती चुणूक जाणवली .मी चळवळीतून आलेला माणूस ! पण जिल्हा परिषदेच्या बारभाई खटल्यात ग्रामसेवक म्हणून घरगड्या सारखा कामाला लागलो आणि चिपाडासारखा झालो .अनेक अर्थाने जुना चळवळीतला जिवंतपणा संपून गेला . पंचवीस वर्षे असेच गेले . त्याला संजविनी देण्याचे काम तुषार देशमुख या माझ्या तरुण मित्राने केले .त्याने उत्साह वाढवला आणि साठीत नवउमेदीत आलो ! त्यामुळेच काही संकल्प करता आले .
श्री गुलाबराव महाराज म्हणजे यज्ञयागी / कर्म कांडी हे जे स्वरूप होते त्याला लोकायत करण्याचा असाच एक संकल्प ! तुषारने लेखनासाठी प्रवृत्त केले .
चांदुर बाजार तालुक्यातील जितक्या म्हणून पुरोगामी चळवळी आहेत .त्या सर्वांना एकत्र जोडून ठेवण्याची किमया त्याच्याकडे आहे . त्यात जिवंतपणा ठेवण्याचे त्याचे सातत्य आहे .जुन्या नव्या कार्यकर्त्यांना म्हणूनच तो पाठबळ वाटतो.राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा,शिवाजीयंस स्पोर्ट्स क्लब,शारीरिक शिक्षक संघटना,ग्रीन रन मॅरेथॉन, शिव दीपोत्सव, जिजाऊ बुक बँक आदी सारखे उपक्रम वर्षभर अखंडित राबवतो.
पूर्णा नदीने आमचा भाग समृद्ध केला .तो भौतीक आहे तसा सांस्कृतिकही आहे ! शेतबांधावर तिच्या पाण्याचा थेंबन थेंब पोहचला आहे . तसेच तिच्या आवर्तनात संत सज्जनांनी / लेखकांनी हा परिसर प्रशस्त केला आहे . याची जाणीव ठेवून डॉ तुषारने एक धाडसी प्रयोग सुरू केला आहे .तो म्हणजे ” पूर्णामाय स्वछता अभियान ” . श्री गणेश उत्सवाच्या विसर्जनाने नदीपात्र अस्वच्छ होते .त्यासाठी निर्माल्य संकलन करून , अनेक वर्षांपासून तो स्वच्छता अभियान राबवत आहे . पूर्णमाय विषयी त्याची ही कृतिशील कृतज्ञता अभिनंदनीय आहे .
शहीद भगतसिंगाचे नावाने क्रांतिदर्शी विचार / कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्वाला गेल्या काही वर्षांपासून शहीद भगतसिंग पुरस्कार त्याने सुरु केला आहे .श्री बच्चूभाऊ कडू / प्रेमभाऊ बोके अशा नामवंतांचा त्यात समावेश आहे
बेभान तरुणाईत ” आगे बढो , हम तुम्हारे
साथ है ” असा कानमंत्र सतत गुंजत असतांना डॉ तुषार वैचारिक संघटन कौशल्य जपून आहे
हाच तारुण्य जगण्याचा आदर्श आहे .आज वाढदिवसानिमित्य त्याच्या वैचारिक नेतृत्वाला शुभेच्छा ! जय जिजाऊ – जय शिवराय !
© पंकज आवारे माधान











