शालेय स्पर्धा चे सूंदर आयोजन ने तालुक्यातील विद्यार्थी मध्ये कौतुकाचा वर्षाव


चांदुर बाजार /- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या माध्यमातून, स्व. केशवदादा टोम्पे यांच्या स्मृतीपित्यार्थ शालेय तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन निर्मिती पब्लिक स्कूल, नानोरी रोड, चांदुरबाजार येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाष्कर टोम्पे होते, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये तहसीलदार लक्ष्मीकांत तिवारी, गटशिक्षणाधिकारी वकार खान, ठाणेदार अशोक जाधव, सहाय्यक ठाणेदार उल्हास राठोड, तालुका क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, सचिव विजयराव टोम्पे, प्राचार्य राजेंद्र रामटेके, सुरेशराव सवळे अध्यक्ष नियोजन समीती,अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ , पत्रकार सागर सवळे, डॉ अहिर , मुख्याध्यापक तुषार खोंड
पंकज उईके सर तालुका क्रीडा संयोजक, नवीन दंडाले अध्यक्ष तालुका शारीरिक शिक्षक संघटना चांदुर बाजार, प्रविण मोहोड उपाध्यक्ष तालुका शारीरिक शिक्षक संघटना चांदुर बाजार, डॉ तुषार देशमुख सर (सचिव) तालुका शारीरिक शिक्षक संघटना चांदुर बाजार सर्व शारीरिक शिक्षक पदाधिकारी व कर्मचारीयांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम स्पर्धा ची सुरुवात कासाब जाधव ,स्व. केशवदादा टोम्पे , गाडगे महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो चे पूजन व मैदान पूजन करून करण्यात आले तर निर्मिती पब्लिक स्कूल तर्फे सर्व मान्यवर यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडू हे राज्यस्तरीय स्पर्धा पात्र झाले पाहिजे हा नेहमी भास्करदादा टोम्पे यांचा संकल्प राहिला आहे त्यांच्या या संकल्पना ला प्रेरणा देत शालेय स्पर्धेचे आयोजन निर्मिती स्कूल येथे करण्यात आले यामध्ये मोठ्या संख्येने तालुक्यातील शाळेने सहभाग नोंदवून आपल्या खेळाचे कौशल्य दाखविले यामध्ये
तालुका पातळीवरील ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली असून विजेत्यांची जिल्हा स्पर्धेत निवड झाली आहे.
अंतिम निकाल पुढीलप्रमाणे —
14 वर्षे मुले : निर्मिती पब्लिक स्कूल – प्रथम होली फेथ इंग्लिश पब्लिक स्कूल – द्वितीय 14 वर्षे मुली :
निर्मिती पब्लिक स्कूल – प्रथम जगदंब पब्लिक स्कूल – द्वितीय 17 वर्षे मुले : नगरपरिषद विद्यालय – प्रथम जगदंब पब्लिक स्कूल – द्वितीय 17 वर्षे मुली : जगदंब पब्लिक स्कूल – प्रथम ऑरेंज लाईन स्कूल – द्वितीय 19 वर्षे मुले : निर्मिती पब्लिक स्कूल – प्रथम ऑरेंज लाईन स्कूल – द्वितीय 19 वर्षे मुली नगरपरिषद विद्यालय – प्रथम निर्मिती पब्लिक स्कूल – द्वितीय असून सुद्धा विजयी व उपविजेता संघ झालेल्या खेळाडूला मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले व जिल्हा स्पर्धेकरीता शुभेच्छा देण्यात आल्या या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन निर्मिती पब्लिक स्कूल शालेय तालुका क्रीडा समिती व चांदूरबाजार फिजिकल अकॅडमी माध्यमातून यशस्वीरित्या करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी खेळाडू पालक शिक्षक उपस्थित होते












