चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिल्या जोरदार घोषणा
तळवेल/प्रतिनिधी…….तळवेल येथील शंकर विद्यालयच्या वतीने नुकतेच स्वच्छता जागृती व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चुमुकल्यांनी दिलेल्या जोरदार घोषणानी ग्अवघे ग्राम दुमदूमले गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता अंतर्गत तसेच राष्ट्रीय हरित सेना शंकर विद्यालय तळवेल च्या वतीने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या.प्रत्येक मुलीजवळ वृक्ष दिला होता.गावात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सर्वप्रथम तुळशी वृक्ष व निम वृक्षाचे पूजन प्रभारी मुख्याध्यापक भाष्कर काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व वृक्ष दिंडी चे संयोजन हरित सेनेचे प्रभारी डॉ तुषार देशमुख यांनी केले यावेळी या दिंडी मध्ये शंकर विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद सहभागी झाले होते




















