➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️क्रांतिकारी समाजसुधारक सत्यशोधक गणपती महाराज यांच्या समाज परिवर्तनवादी कार्यावर प्रकाश टाकणा-या चरित्र ग्रंथाच्या व्दितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा व त्या अनुषंगाने ‘ महाराष्ट्रातील समता वादी संत परंपरा व सत्यशोधक गणपती महाराज ‘ या विषयावर प्रबोधन व्याख्यान आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ अमरावती व श्वेतनिशान धारी अजातीय मानव संस्था मंगरूळ दस्तगीर यांच्या वतीने दिनांक १६ ऑगस्ट २५ शनिवार रोजी, संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृह, गाडगेबाबा नगर अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचेअभ्यासक व प्रचारक ज्ञानेश्वर दादा रक्षक-हे होते.प्रास्ताविकामध्ये अजात मानव संप्रदायाचे प्रा डॉ सुरेंद्र माणिक यांनी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला व कार्यक्रमाचे औचित्य प्रतिपादीत केले.
यावेळी जनसांस्कृतिक चळवळीची भूमिका व त्यासंदर्भात होत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती डॉ प्रकाश मानेकर यांनी दिली.
ग्रंथाचे लेखक व संत साहित्याचे अभ्यासक प्रा डॉ बाळ पदवाड यांनी ग्रंथा विषयी माहिती देऊन गणपती महाराजांच्या जिवनातील घटनांचा उल्लेख केला.
या नंतर उपस्थित मान्यवरांनी ‘ समाज सुधारक गणपती महाराज ‘ या चरित्र ग्रंथाचे औपचारिक प्रकाशन झाल्याचे जाहीर केले.यावळी विचार पिठावर ज्ञानेश्वर दादा रक्षक-, हभप नितीन सावंत परभणीकर महाराज, डॉ बाळ पदवाड, लेखक व साहित्यिक प्रा डॉ सुभाष सावरकर, प्रबोधनकार रविदादा मानव, अमर भाऊ वानखडे, मुकुंद काळे, कुमुदिनी वाडेकर, प्रा उषाताई पातुर्डेकर, सुनयना अजात, प्रा डॉ काशिनाथ ब-हाटे–, प्रा डॉ प्रविण बनसोड,सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सामाजिक विचार प्रबोधन अभियान चे समन्वयक प्रा संदीप तडस, भेंडे, प्रा डॉ सुरेंद्र माणिक, डॉ प्रकाश मानेकर उपस्थित होते.
प्रमुख व्याख्याते प्रसिद्ध प्रबोधनकार धर्म किर्ती महाराज नितीन सावंत परभणीकर यांनी अत्यंत उद्बोधक व समर्पक,ओघवत्या शैली मध्ये महाराष्ट्रातील थोर परिवर्तनवादी व समतावादी सुधारक संतांच्या कार्याचा आढावा घेऊन आधुनिक काळात समतावादी संत परंपरा फक्त विदर्भात कशी वाढली व महाराष्ट्रातील इतर विभागातील समिक्षकांना वारंवार विदर्भात येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, सत्यशोधक गणपती महाराज, गणपती महाराज यांच्या समतावादी विचारांकडे यावं लागतं.
गणपती महाराज हे महात्मा ज्योतिबा फुले यांच कृतिशील सत्यशोधक कार्य पुढे नेण्यासाठी संघर्षरत समतावादी सुधारक संत होते.
सर्व जातीय सामुहिक काला, दलित बहुजनांकरीता विहीर, विठ्ठल मंदिर प्रवेश, विधवा विवाह यासंबंधीची व्यापक कृतिशील कार्य केले, व त्याची सुरुवात स्वतःपासून करुन विधवा महिलेसोबत विवाह केला.
महात्मा बसवेश्वरानंतर गणपती महाराज असे एकमेव सुधारक होते ज्यांनी विधवा विवाहा करीता पुढाकार घेतला.
अशा महान क्रांतिकारक संतांचे विचार व कार्य महाराष्ट्र भर पोहचविण्यासाठी मी स्वतः प्रचारक म्हणून कार्य करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.
अत्यंत मार्मिक,प्रभावी मांडणी मुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, परतवाडा येथील कढी कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ काशीनाथ ब-हाटे यांनी विदर्भातील चार समतावादी सुधारक संत – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, सत्यशोधक गणपती महाराज, सेवालाल महाराज यांच्या कार्याचा विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यासक्रमात समावेश होत असल्याची माहिती दिली.उपस्थितांनी या बाबीच उस्फुर्त स्वागत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा रक्षक यांनी विदर्भातील समतावादी सुधारक संत परंपराचा आढावा घेऊन त्याकरीता प्रचारक तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळीचे मुकुंद काळे व प्रा कुमुदिनी वाडेकर यांनी केले.आभार प्रदर्शन गणपती महाराजांची पणती सुनयना अजात यांनी केले.
कार्यक्रमाच्या आधी अजात संप्रदायातील प्रबोधनकार हभप किसनराव शेंडे महाराज व सहकारी मंडळीनी महारांजांचे अभंग व किर्तन सादर केले.
कार्यक्रमाकरिता अमरावती जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक, नागरिक व अजात संप्रदायातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिष दादा चरपे, प्रा संतोष शुक्ला, धर्मेंद्र भांडारकर, माधव गिरी, प्रा शरद पुसदकर,माया ताई वाकोडे,विणाताई तांबी, प्रभा जाऊरकर,पेंदाम दादा,
प्रा अभिजित मेंढे,प्रा डॉ शांताराम चव्हाण, सुनील घटाळे, विवेक वाडेकर, विठ्ठलराव हिवसे, प्रकाश कळसकर, विजय डवरे, कृष्णा शुक्ला, उषाताई पातुर्डेकर, गंगाधर नाखले, जितेंद्र निमकर, व शेंडे कुटूंबियांनी ,दिनेश बिजवे सर किचक, मधुकरराव शिरभाते नरेंद्र बिजवे यांनी भरपूर परिश्रम घेतले.















