चांदुर बाजार/प्रतिनिधी……महाराष्ट्रातील महिलांची अत्यंत क्रांतिकारी संघटना असलेल्या जिजाऊ ब्रिगेड या संघटनेची चांदुर बाजार तालुका कार्यकारिणी ची सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिजाऊ पूजन व वंदना करून सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके अध्यक्षस्थानी होत्या.त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष डॉ अंजली जवंजाळ सचिव…. आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी सीमाताई बोके यांनी जिजाऊ ब्रिगेड चा विचार उपस्थित महिलांना सांगितला.यावेळी तालुका कार्यकारणी तयार करण्यात आली अध्यक्षपदी मुख्याध्यापिका शुभांगी चरपे यांची तर सचिव पदी स्वाती देशमुख यांची तसेच कार्याध्यक्ष पदी कांचन बंड उपाध्यक्ष पदी स्वाती बोरखडे तर शहर अध्यक्ष पदी मेघा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी साक्षी बंड हिचा प्राध्यापक पदी नियुक्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.विस्तारित कार्यकारणी ची लवकरच सभा घेऊन अधिक महिला जोडनार असल्याचे अध्यक्ष चरपे यांनी सांगितले. यावेळी बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होत्या.








