महागाव प्रतिनिधी- मराठा सेवा संघ महागाव तालुक्याच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व बारावी मध्ये गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक २२ जुन २०२५ रविवारी मातोश्री विद्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ सुनंदाताई दिलीपराव कोपरकर नगराध्यक्ष नगरपंचायत महागाव ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवश्री सुरेश कदम सर जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ यवतमाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश पाटील नरवाडे माजी उपाध्यक्ष नगरपंचायत महागाव, राजूभाऊ राठोड शिवसेना तालुकाप्रमुख, प्रमोद उर्फ शाखा भरवाडे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष तथा सभापती नगरपंचायत महागाव, प्रमोद जाधव तालुकाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, नारायण शिरबिरे नगरसेवक, संजय कोपरकर मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष हे होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संत विचार हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता बारावी व इयत्ता दहावी मधून तालुक्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मराठा सेवा संघाची शिवधर्म दिनदर्शिका, जिजाऊ चरित्र पुस्तक, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले नंतर तालुक्यातील सर्व शाळेतुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत सुद्धा जिजाऊ चरित्र हे पुस्तक, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर प्रमुख मार्गदर्शक शिवश्री सुरेश कदम सर जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ यवतमाळ यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप शिंदे यांनी केले तर अमोल जगताप यांनी आभार मानले. या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उदयभाऊ नरवाडे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष, पंकज देशमुख मराठा सेवा संघ तालुका सचिव, डॉ. संदीप शिंदे जिल्हा सचिव, अमोल जगताप जिल्हा कार्यकारणी सदस्य तसेच मराठा सेवा संघाचे सतीश ठाकरे, विठ्ठल वाघमारे, स्वप्निल नरवाडे, किशोर सोळंके, चतुर्वेद अडकिने ,सुरज धोंगडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष गावंडे तसेच शिक्षक विजय कदम व रवी भांगे यांनी प्रयत्न केले.
