प्रतिनिधी………महाराष्ट्र सेपक टाकरा असोसिएशन व नाशिक जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सिनिअर व जुनिअर सेपक टाकरा स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे दिनांक 28 ते 30 जून दरम्यान करण्यात आहे आहे या करिता अमरावती जिल्हा संघाची निवड चाचणी नुकतीच अमरावती येथे संपन्न झाली यामध्यें मुलांच्या संघात चांदुर बाजार येथील शिवाजीयंस स्पोर्ट क्लब च्या 10 विद्याथ्यांची निवड जिल्हा संघात करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे मोर्शी येथील 2 विद्यार्थी तर अमरावती येथील 3 विद्यार्थ्याचा समावेश संघात करण्यात आला आहे. यामध्यें चांदुर बाजार येथील जी आर काबरा विद्यालय,शिवाजी हायस्कुल शि.बंड,शंकर विद्यालय तळवेल व हॉलिफेथं इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर मुलींच्या संघात कस्तुरबा कन्या शाळा अमरावती व जनता हायस्कुल शेंदुरजना खुर्द येथील खेळाडूंचा समावेश आहे.या संघाची निवड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ हनुमंत लुंगे, डॉ सुगंध बंड,डॉ तुषार देशमुख,आनंद उईके,डॉ पडोळे सर यांच्या निवड समितीने केली आहे



