संभाजी ब्रिगेडच्या मागणीने तात्काळ पंचनामे करण्या बाबत तहसीलदार यांनी दिले आदेश.

चांदूरबाजार प्रतिनिधी:-
अवकाळी पावसाने चांदूरबाजार तालुक्यातील कांदा व इतर पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ब्राम्हणवाडा थडी, ब्राम्हणवाडा पाठक, माधान , विश्रोळी तसेच आसेगाव परिसरातील शेतकऱ्याचे शेता मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले असून कांदा या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामा करून शासनाने त्वरित मदत करावी या बाबत संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष डॉ. श्री. तुषार देशमुख यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार सोनारकर साहेब यांना निवेदन देण्यात आले व मा. तहसीलदार शेळके साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून झालेल्या परिस्थिती माहिती देण्यात आली आणि तात्काळ मा. तहसीलदार यांनी संभाजी ब्रिगेड चा निवेदनाची दखल घेऊन तत्काळ पंचनामे करण्या बाबत आदेशित केले.
अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांन चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून डोळ्यामध्ये पाणी आणले. चांदूरबाजार मध्ये ओला दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झाली शासनाने तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या बाबत संभाजी ब्रिगेड चा वतीने मागणी करण्यात आली आहे.यावेळी पत्रकार बादल डकरे उपस्थित होते.
