93 वृक्षांच्या प्रती घाम गाळून केली कृतज्ञता व्यक्त जिल्ह्यातील शिक्षक व खेळाडूंचा केला सन्मान नागपूर चे स्पर्धक ठरले अव्वल









चांदुर बाजार प्रतिनिधी….स्वराज्यवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती पर्वावर व 93 वृक्षाना श्रद्धांजली म्हणुन संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,गो सि टोम्पे महाविद्यालय,तालुका डॉक्टर्स असोसिएशन व तालुका शारीरिक शिक्षक संघटना यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्यस्तरीय खुला गट प्रथम क्रमांक सौरभ तिवारी नागपूर द्वितीय नागराज खूरसुने तृतीय पियुष मसाने नागपूर यांनी पटकवला तर प्रोत्साहनपर क्रमांक डॉ आर के देशमुख व आनंद हिवराळे गुरुजी यांना देण्यात आला 14 वर्षाआतील गटात रुद्र निस्ताने, सोहम जाधव,अनुज दळवी यांनी क्रमांक मिळविला.मुलींच्या गटात संस्कृती पळसपगार,कार्तिकी धरपाळ,श्रावणी भटकर यांनी मिळविला. डॉक्टर्स गटात डॉ प्रेरित ताथेड,डॉ निलेश तिरमारे,डॉ सैफी यांनी क्रमांक मिळवले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचेउदघाटक म्हणुन माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके,प्रमुख अतिथी म्हणुन डॉ नितीन चवाळे,डॉक्टर्स असोसिएशन चे डॉ मुकुंद मोहोड डॉ हेमंत रावळे,शारीरिक शिक्षक संघटनेचे डी आर नांदुरकर,पंकज उईके,बबलू देशमुख जेष्ठ पत्रकार मदन भाटे,जिजाऊ ब्रिगेड प्रदेश संघटिका प्रा मनाली तायडे स्पर्धेचे संयोजक डॉ तुषार देशमुख,मनिष नागले,प्रवीण पारधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडा शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे तालुक्यातील राष्ट्रीय खेळाडू यांचाही सन्मान करण्यात आला. चांदुर बाजार येथील युवा पत्रकार सागर सवळे व क्रीडा पत्रकार सुयोग गोरले यांचाही सत्कार आयोजन समितीने केला. बच्चूभाऊ कडू यांनी आयोजन समिती चे कौतुक केले व अशा आयोजनाला सदैव मदत करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाला संपुर्ण राज्यातील स्पर्धक,पालक व क्रीडा प्रेमी मंडळी उपस्थित होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ तुषार देशमुख सूत्रसंचालन निखिल काटोलकर यांनी तर आभार पंकज उईके यांनी मानले.यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासन, परिवहन महामंडळ,तालुका शारीरिक शिक्षक संघटना,शिवाजीयंस क्लब,जगदंब क्लब,माऊली स्पोर्ट,शेषस्मृती क्रीडा मंडळ च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.


