.
प्रतिनिधी. …नुकतीच श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल व ‘MYELIN'( Zenworks Solutions PVT LTD)पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.AI(Artificial intelligence)For Teacher and Student अंतर्गत
कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी राजाभाऊदेशमुख (अध्यक्ष श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था) ,नरेन्द्रराव देशमुख (सचीव श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल) सदस्या जयश्रीताई देशमुख यांच्या उपस्थितीत व MYELIN (Zenworks Solutions PVT LTD)तर्फे श्री मनोज देशपांडे, नेहा देशपांडे नेहा दरेकर यांनी सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांना AI( Artificial intelligence)For Teacher and Student यासंदर्भात कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल आपल्या पाच मराठी माध्यमाच्या शाळा आणि एक इंग्रजी माध्यमाच्या शाळेसह ग्रामीण भागात शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे ग्रामीण शिक्षणात क्रांती घडवण्यासाठी आता नवीन AI ( Artificial intelligence) चा अवलंब संस्थेच्या पाचही शाळेत शिक्षक सक्षमीकरण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याकरिता करण्यात येणार आहे श्री राजाभाऊ देशमुख अध्यक्ष यांचे नेतृत्वात श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था व MYELIN (Zenworks Solutions PVT LTD)यांच्यासोबत 24 महिन्यांचा करार केला आहे हा उपक्रम प्रत्यक्ष15 मे 2025 पासून शिक्षक कार्यशाळेने सुरू झाली. श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थां आणि परिसरातील शिक्षकांसाठी AI( Artificial intelligence)चे प्रादेशिक केंद्र म्हणून उदयास येईल त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा उंचावेल आणि पालकांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेकडे कल निर्माण होईल त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या गैरसमजनांना सुद्धा आव्हान मिळेल.आमच्या शाळेतील प्रत्येक मुलाला मराठी माध्यमातून शिकताना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे हा माझा संकल्प आहे यामुळे इंग्रजी भाषा येत नाही हा न्यूनगंड आता दूर होईल शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने देऊन आम्ही त्यांना समक्ष सक्षम बनवत आहोत ज्यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांना आणि परिसरातील इतर शिक्षकांना सुद्धा प्रेरणा देतील असे राजाभाऊ देशमुख म्हणाले.
श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था AI च्या माध्यमातून स्थानिक सांस्कृति आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणेल त्यामुळे पालकांना खात्री पटेल की आपले मुले स्थानिक भाषेत उज्वल भविष्य घडवू शकतात NEP 2020 च्या अंमलबजावणी मध्ये पुढचे पाऊल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे व्हिजन नुसार बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थां आता AI ( Artificial intelligence) वर आधारित मूल्यांकन आणि वैयक्तिक शिक्षण पद्धती लागू करेल या विद्यार्थ्यांची उच्चस्तरीय कौशल्य, विश्लेषण ,सर्जनशीलता वाढवणे त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ग्रामीण भागात जागतिक दर्जाच्या बनतील आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलने त्यांचा नावलौकिक वाढेल.श्री राजाभाऊ देशमुख यांचा शिक्षक सक्षमीकरणावर दृढ विश्वास आहे त्यांच्या मते शिक्षक शिक्षणाचा कणा आहे आणि त्यांना नव्या तंत्रज्ञाची साधने देऊन आपण त्यांचे समर्थ्य वाढू शकतो श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे शिक्षण AI ( Artificial intelligence)साधनांचा वापर करून शिक्षक पाठ नियोजन विद्यार्थी गृहपाठ, मूल्यमापन दैनंदिन उपस्थिती,पालक संपर्क करतील . विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करतील आणि परिसरातील शिक्षकांना मार्गदर्शन करतील त्यामुळे तळवेल ही शिक्षणाचे केंद्र बनेल आणि शिक्षक आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रेरणा देतील
श्री राजाभाऊ देशमुख अध्यक्ष यांचा पालकांना संदेश – आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवण्यात अभिमान बाळगा श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तुमच्या मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण देने आणि तुमच्या सहकाऱ्याने आम्ही तळवेलला शिक्षणाचे मॉडेल बनवू 15 मे 2025 च्या कार्यशाळेपासून हा प्रवास सुरू होत आहे चला एकत्र मिळून आपल्या गावाचा नावलौकिक वाढवूया यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे संचलन माधुरी देशमुख प्रस्तविक विनोद तिरमारे तर आभार डॉ तुषार देशमुख यांनी मानले.यावेळी संस्थेतील मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.






