.
चांदूरबाजार (प्रतिनिधी): स्वराज्यवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी, गो. सि. टोम्पे महाविद्यालय, तालुका शारीरिक शिक्षक संघटना व डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन रन मॅरेथॉन २०२५ (पर्व ४ थे)’ चे राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन २१ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजता गो. सि. टोम्पे महाविद्यालय, चांदूर बाजार येथून सुरू होणार आहे.
या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटांसाठी चार स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. पुरुष खुला गटासाठी ११ कि.मी., १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी प्रत्येकी १ कि.मी., तसेच डॉक्टर्स, शिक्षक व कर्मचारी गटासाठी १ कि.मी. अंतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
प्रवेश फी १०० रुपये असून अंतिम नोंदणीची तारीख १८ मे २०२५ आहे. इच्छुक स्पर्धकांनी वेळेत नोंदणी करून QR कोडद्वारे प्रवेश निश्चित करावा.
या मॅरेथॉनसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. मुख्य आकर्षण म्हणून पुरुष खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक ११,००० रुपये (प्रायोजक मा. बच्चूभाऊ कडू, माजी राज्यमंत्री), द्वितीय ५,००० रुपये (तालुका डॉक्टर्स असोसिएशन) व तृतीय ३,००० रुपये (स्व. अपन गावंडे व सौपाल कोरडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ) देण्यात येणार आहेत.
१४ वर्षांखालील मुले व मुली गटासाठी प्रथम पारितोषिक १,००० रुपये, द्वितीय ७०० रुपये व तृतीय ५०० रुपये असेल. डॉक्टर्स, शिक्षक व कर्मचारी गटातील विजेत्यांना प्रोत्साहनपर मेडल देण्यात येणार आहे.
प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व मेडल दिले जाईल.
स्पर्धेचे मार्ग: गो. सि. टोम्पे महाविद्यालय ते खरवाडी फाटा असा निश्चित करण्यात आला आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रम २१ मे रोजी सकाळी ८ वाजता गो. सि. टोम्पे महाविद्यालयात होणार आहे.
स्पर्धेचे नियम व अटी:
स्पर्धा वेळेवर (सकाळी ६ वाजता) सुरू होईल.
स्पर्धकांनी आयोजकांकडून दिलेला चेस नंबर लावणे बंधनकारक आहे.
फक्त क्रीडा परिधानात (टी-शर्ट, गेम पॅन्ट) सहभाग घेता येईल.
शिस्तभंग केल्यास स्पर्धकाला बाद करण्यात येईल.
स्पर्धकाची जबाबदारी स्वतःची असेल.
आयोजकांना नियम व वेळापत्रकात बदल करण्याचा पूर्ण अधिकार राहील.
विशेष सहकार्य:
पोलीस स्टेशन चांदूरबाजार, म.रा. परिवहन महामंडळ, शिवाजीयन्स स्पोर्ट्स क्लब, माऊली स्पोर्ट्स, धर्माळे बंधू किराणा स्टोअर्स, सनफ्लोरा नर्सरी, द बॅनरवाला ग्रुप व इतर क्रीडाप्रेमी मंडळींनी सहकार्य केले आहे.
आयोजन समितीचे संयोजक पी डी उईके,डॉ तुषार देशमुख (9730015899) नरेंद्र देशमुख,डी आर नांदुरकर,प्रवीण पारधी,निखिल काटोलकर,श्रेयश बर्वे,सुयोग गोर्रले,प्रतिक देशमुख सचिन किटुकले,यांच्यासाह सर्व सदस्यांनी केले आहे.
