प्रतिनिधी : – खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.यामध्यें सेपक टाकरा खेळाचे प्रथमच समावेश करण्यात आला आहे याची राज्य निवड चाचणी चे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे.याकरिता अमरावती जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन कडून जिल्हा निवड चाचणी चे आयोजन डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय मैदानावर करण्यात आले होते. यामध्यें एकूण 48 मुले मुलींनी सहभाग घेतला यामध्यें 5 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यामध्यें मुलांमध्ये चांदुरबाजार येथील शिवाजीयन्स स्पोर्ट क्लब चे खेळाडू व जी आर काबरा विद्यालयचे विद्यार्थी सार्थक विधळे व देवान्ग पाटील तसेच मुली मधून कस्तुरबा कन्या शाळा अमरावती च्या जेसीका काळे,अंजली राठोड व आयुषी दिवाण यांची निवड करण्यात आली आहे यावेळी निवड समितीचे अध्यक्ष व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ हनुमंत लुंगे, डॉ सुगंध बंड,आनंद उईके व डॉ तुषार देशमुख यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे याबद्दल शिवाजीयंस स्पोर्ट क्लब चे मार्गदर्शक तसेच गो सी टोम्पे महाविद्यालय ट्रस्ट चे अध्यक्ष भाष्कर दादा टोम्पे,कस्तुरबा कन्या शाळेच्या मुख्याध्यपिका लुंगे मॅडम,क्लब चे सचिव डॉ तुषार देशमुख,क्रीडा मार्गदर्शक पंकज उईकेयांनी अभिनंदन केले आहे.


