* प्रत्येक काम योग्य प्रकारे करणे म्हणजेच योग : योगाचार्य डॉ आर के देशमुख
तळवेल/ प्रतिनिधी……..शंकर विद्यालयाच्या वतीने आजपासून छंद शिबिराला सुरुवात झाली.आज पहिल्या दिवशी उदघाटन संपन्न झाले यावेळी उदघाटक म्हणुन प्रसिद्ध योग प्रचारक तथा डॉ पंजाबराव देशमुख योग महाविद्यालय चे संचालक डॉ आर के देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी बोलतांना योग म्हणजे प्रयेक कृती योग्य प्रकारे करणे.शिस्तीत करणे म्हणजेच योग होय,असे सांगितले तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सोपे व्यायाम त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.आहाराचे महत्व काय आहे,कोणत्या वयात कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक डी बी वानखडे प्रमुख उपस्थित म्हणुन फुटाणे मॅडम,भाष्कर काळे,डॉ तुषार देशमुख,प्रिया देशमुख,कविता देशमुख,मंगळे मॅडम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ तुषार देशमुख यांनी मानले







