प्रतिनिधी……गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित राज्यस्तरीय गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता अंतर्गत परीक्षणासाठी शंकर विदयालय तळवेल येथे गिरीश कुलकर्णी,विश्वजित पाटील व संजय जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.अहवाल नोंदणी,उपक्रम अंमलबजावणी,सहभागी विद्यार्थी व विद्यार्थ्यात झालेले बदल याविषयी चर्चा समितीने मुलांशी केली.मुलांमध्ये स्वच्छता मूल्य रुजवणे काळजी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक असल्याने त्याच्यात पर्यावरण व स्वच्छता मूल्य रुजवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन गिरीश कुलकर्णी यांनी केले यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सुभेदार वैकुंठराव वानखडे प्रमुख उपस्थित म्हणुन शाळा समिती चे श्रीधर भोकसे,राम गेडाम मुख्याध्यापक दिलीप वानखडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी शाळेस्तरावर आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन स्पर्धा समन्वयक डॉ तुषार देशमुख यांनी तरं आभार भाष्कर काळे यांनी मानले
