शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांची ग्वाही
चांदुर बाजार / प्रतिनिधी
शेतकरी संघटनेच्या पायाभरणीतला बिनीचा कार्यकर्ता
नंदुभाऊ बंड यांना गमावल्याचे दुःख असून, या शोक सभेसाठी जुने जाणते सर्व नेते सहभागी आहेत . त्यामुळे नंदुभाऊंनी पाहिलेल्या शेतकरी उत्थानाची दिशा आणि प्रेरणेचे ठिकाण सदैव खरवाडी असेल . ते आत्मभान उपस्थितीत नेते आणि कार्यकर्ते यांना आहे .
असे प्रतिपादन शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी केले . एकेकाळच्या शेतकरी संघटनेच्या रणरागीनी म्हणून परिचीत असलेल्या आणि अमरावती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे यांनी खरवाडी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून शंकरअण्णा बोलत होते .
सुप्रसिद्ध चिंतक आणि शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनी, शेतकरी संघटनेचा विचार पटून त्या वादळात झपाटलेल्या नंदुभाऊ साठी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या . विद्यमान सरकार शेतकऱ्यांशी जुलूमाने वागत असून, अर्थमंत्र्याने 28 मार्चला पीक कर्ज भरण्याचे आवाहन केल्या बरोबर हवालदिल शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रमाण वाढले . तर राज्यातल्या एकूण ओसाड होणाऱ्या गावांच्या यादीत विदर्भाचे प्रमाण अधिकचे आहे . याकडे त्यांनी लक्ष्य वेधले . सरकारने कायदे बदलण्याचा सपाटा सुरू केला असून त्यावर चिंतन झाले पाहिजे . अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
विविध वळणवाटावर उभे असलेल्या जुन्या शेतकरी संघटनेचे सर्व लोक या आदरांजली साठी मैत्र घेऊन आले आहेत . त्यामुळे नंदुच्या अपूर्ण कामाचे नवचिंतन येथून सुरू होईल . असा आशावाद शेतकरी नेते किशोर माथनकर यांनी व्यक्त केला . आपल्या प्रास्ताविकात सुरेखाताई ठाकरे यांनी जुन्या स्मृतीला उजाळा दिला .
शरद क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी नंदुभाऊचे योगदान अधोरेखीत करत , एलएमके ही त्यांनी ऊभी केलेली शेतकरी कंपनी ही कायम स्मृती म्हणून राहील . त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू . असे आश्वासन दिले . तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत काळमेघ यांनी शिव परिवारातर्फे आदरांजली वाहीली .
सर्वश्री दत्ता पवार / लक्ष्मण वांडले / विजय विल्हेकर /कविवर्य बबन सराटकर / गणेश हलकारे / विजय कडू / जगदीशनाना बोंडे / संजय कोल्हे / विठ्ठलराव गोटे / राजाभाऊ भेटाळू / हरिश इथापे / घनःशाम पेठे / डॉ . ढोले इत्यादिंनी आपल्या भावना व्यक्त केल्या . तर एकनाथराव बंड यांनी आम्हाला दुःख पेलण्याचे बळ या सभेतून मिळाले . अशा भावना व्यक्त केल्या . प्रितीताई बंड / कांचनताई नंदकुमार बंड / कु साक्षी आणि खुशी व आप्त परिवार यावेळी उपस्थित होता . सामुहिक श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सांगता झाली . सूत्र संचालन डॉ. तुषार देशमुख यांनी केले . तर सुगंध बंड / मनिष बंड / बाळसाहेब खडके / डॉ . नरेंद्र देशमुख / कॉ. पंकज आवारे इत्यादींनी आयोजनात सहकार्य केले .










