आपणास माहीत आहे की महात्मा जोतीराव फुले हे भारतातील समाजक्रांतीचे आद्य समाजसुधारक होते. त्यांनी अनिष्ट रूढी प्रथा – परंपरांना तिलांजली देवून आधुनिक भारत घडविण्याच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या सामजिक कार्याविषयी आपण सर्व ज्ञात आहात. महात्मा फुले हे जाणून असावेत की हजारो वर्षापासून विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या या देशातील गरीब, दलीत, शेतकरी, श्रमकरी, महिला यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासठी जे काम करावयाचे आहे त्या करीता मोठ्या प्रमाणात अर्थबळाची गरज पडेल. तो अर्थबळ उभा करू शकलो तरच आपण सामजिक सुधारणेचा अंतिम टप्पा पार पाडू शकू आणि म्हणून त्यांनी समाजसुधारणा बरोबरच उद्ध्योग निर्मितीची पायाभरणी केली. म्हणजे महात्मा फुले केवळ महान समाजसुधारकच नव्हते, तर एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योजक होते. समाजसुधारका बरोबर व्यापारी आणि शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
महात्मा फुलेंकडे असलेल्या शेतीतून जे फुलं काढायचे त्या फुलांच्या व्यवसायातून वर्षाला प्रचंड उत्पन्न काढायचे. फुलं आणि भाजीपाला ते बाहेर निर्यात करायचे.
या व्यतिरिक्त त्यांनी धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, रस्ते इत्यादींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. ते पुणे कमर्शियल आणि कॉंट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक होते. त्यांनी मुंबई महानगलपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचं रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल इत्यादी बांधकामे उभारण्यात जोतीरावांचा कॉंट्रक्टर म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता. त्यांच्या कंपनीने केलेला कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा ही महत्त्वाची कामं आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे दगिण्यांना सोन्याचा मुलामा चढविण्याचे कॉन्ट्रॅक्ट होते. यातून मिळवलेले पैसे जोतीरावांनी सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकले. जोतीरावांनी आपली सर्व संपत्ती गोरगरीब बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी, गोरगरिबांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी खर्च केली.
महात्मा फुलेंचा समाजसुधारणेच्या कर्याबरोबर त्यांनी उद्योगक्षेत्रात केलेले भरीव कार्य समजुन नोकऱ्यासाठी वण – वण फिरणाऱ्या तरुणांनी महात्मा फुले समजुन घ्यावे. त्यातून प्रेरणा घ्यावी. प्रचंड आर्थिक सक्षम होवून सामजिक कर्यात योगदान द्यावे.
महात्मा फुलेंचे वार्षिक आर्थिक उलाढाल रु. २१०००/- र
होते. तेव्हा टाटाचे वार्षिक उत्पन्न रु. २००००/- होते. यावरूनच महात्मा जोतीराव फुलेंच्या श्रीमंतीचा अंदाज करता येतो. पण राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी संपुर्ण जीवन काळात उद्योगातून कमावलेला पैसा बहुजनसमाजासाठी अर्पण केला. ते जर स्वतःसाठी जगले असते तर आज जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत पहिले असते. पण मित्रहो राष्ट्रपिता जोतीराव फुले यांची कतृत्वाची श्रीमंती मोजायला कोणतेच माप नाही आहे. लाखो पिढ्या जन्माला येतील आणि जातील पण महात्मा जोतीराव फुले कायमचं बहुजन समाजाच्या – भारतीयांच्या मनात राहतील…….!!
अशा समजशिल्पी उद्योजकास जयंतीदिनी विनम्र अभिवादन…!!
===== अनिल भुसारी =====
विभागीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ
तुमसर, जि. भंडारा.
