अमरावतीप्रतिनिधी 24/. हौशी सेपक टकारॉ असोसिएशन अमरावती च्या वतीने नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सेपक टकारॉ स्पर्धेसाठी निवड चाचणी चे आयोजन दिनांक 25 ऑगस्ट रोजी अमरावती येथे आयोजित केली आहे यामध्यें जुनिअर गटासाठी पात्र वर्ष 1/1/2006 असून सबजुनिअर गटा साठी 1/1/2011 आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय च्या खेळाडू विद्यार्थ्यांनी या चाचणी करिता 25 ऑगस्ट रोजी इनडोअर हॉल तक्षशिला महाविद्यालय अमरावती येथे सकाळी 9 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन अमरावती हौशी सेपक टकारॉ असोसिएशन चे अध्यक्ष प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे उपाध्यक्ष डॉ सुगंध बंड, सचिव आनंद उईके, प्रशिक्षक तथा निवड समिती सदस्य डॉ तुषार देशमुख, प्रा डॉ हरीश काळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ हनुमंत लुंगे (94234 24950) व डॉ तुषार देशमुख(9730015899) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











