पारंपरिक पोळ्याला तंत्रज्ञानाची जोड उत्कृष्ट बैल जोडीचा झाला सन्मान. तळवेल प्रतिनिधी….तळवेल हे जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय दृष्टीने प्रसिद्ध असे गाव, परंपरा पाळणारे जुने मोठे वाडे या गावाचं वैशिष्ट्य या गावातील पोळा ही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.हे आयोजन श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था,शंकर विद्यालय तळवेल यांच्या वतीने व गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने केले जाते.बैल हा आपल्या भारतीय परंपरेत महत्वाचे स्थान असणारा प्राणी त्याला घरातल्या सदस्या प्रमाणे स्थान शेतकरी देतो त्याच्या प्रती आदर म्हणुन पोळा हा सन साजरा केला जातो, त्याच्या प्रती आदर म्हणुन पोळा हा सन साजरा केला जातो. यावर्षी दरवर्षी कमी होणाऱ्या बैल जोड्या लक्षात घेता,ट्रॅक्टर सजावट स्पर्धा घेण्यात आली.यावेळी तळवेल येथील नागरिकांनी ट्रॅक्टर सजावट स्पर्धेलाही भरभरून प्रतिसाद दिला यावेळी झालेल्या कार्यक्रमाला श्री बाबराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,माजी पोलीस पाटील शशीमोहनजी देशमुख, प्रा चंद्रशेखरजी देशमुख, अड अमरजी देशमुख,प्रसिद्ध लेखक जी बी देशमुख, व्यक्तिमत्व विकास चे प्रशिक्षक प्रा. मोरे सर, संस्थेचे सचिव नरेंद्रराव देशमुख, बालाजीराव देशमुख, ट्रॅक्टर सजावट स्पर्धेचे आयोजक रविराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी गावातील उत्कृष्ट बैलजोड्यांना रोख बक्षीस,नारळ टोपी दुपट्टा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.सर्व बक्षिसे प्रकाशराव फुलझेले,शरदराव बोंडे राजाभाऊ दादा देशमुख व श्री संत गजानन महाराज सेवा समिती तळवेल यांच्या तर्फे तर ट्रॅक्टर सजावट स्पर्धा चे बक्षीस दीपकराव नाईक यांच्या कडून देण्यात आले.कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.











