चांदुर बाजार/ प्रतिनिधी:-
राष्ट्रीय हरित सेना शंकर विद्यालय तळवेल क्षात्रवीर प्रतिष्ठान व शिवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पूर्णामाय स्वच्छता व निर्माल्य संकलन अभियानाचे आयोजन पूर्णाघाट कुरळ पूर्णा येथे करण्यात येते यावर्षी हे अभियानाचे आठवे वर्ष होते. गणेश विसर्जन झाल्यानंतर यावर्षी पूर्णाघाट पूर्ण अस्वछ झाला होता.सर्वत्र अर्धवट गणेश मूर्ती विखूरल्या होत्या.त्यातील काही मूर्तिचे एकत्रीकरणं करून विसर्जन करण्यात आले.त्याचप्रमाणे स्वच्छता करण्यात आली.यावेळी उपस्थित नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी या अभियानाचे आयोजन गांधी तीर्थ स्वच्छशाळा अभियाना अंतर्गत यावर्षी करण्यात आले होते.यावेळी या अभियानाचे संकल्पक तथा राष्ट्रीय हरित सेना प्रभारी डॉ तुषार देशमुख अभियान समन्वयक प्रतीक देशमुख,सदाशिव देवताळे, राष्ट्रीय हरित सेनेचे सैनिक आर्यन गेडाम,प्रेम लहाने,दीपक चाढोकार,संस्कार ओलीवकर,ईश्वर हाते,श्री इटकीकर,फरदिन शाह,अनिरुद्ध मालवे,यज्ञश मोहोड,कृष्णल मोहोड,नैतिक शिंगाडे,यश सांगोले,प्रणव चव्हाण,पियुष पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते या अभियानाला संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,संस्थेचे सचिव नरेंद्रराव देशमुख,सहसचिव रविराज देशमुख,मुख्याध्यापक भाष्कर काळे यांचे मार्गदर्शन मिळाले.



















