मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांचे प्रतिपादन
तळवेल येथील शंकर विद्यालयात शिक्षक दिन व आदर्श शिक्षक सत्कार सोहळा संपन्न






तळवेल/प्रतिनिधी :-
‘माझं स्वप्न आयएएस होण्याचं होत.परंतु गरीब परिस्थितीमुळे ते शक्य होईल की नाही सांगता येत नव्हतं,परंतु माझ्या शिक्षकांनी मला सर्व शिक्षणात मदत केली त्यामुळेच मी शिकू शकले आणि आज अधिकारी म्हणुन तुमच्यासमोर बोलू शकत आहे‘ असे भावोद्गार अमरावती जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी काढले त्या शंकर विद्यालय तळवेल येथे आयोजित शिक्षक दिन व आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणुन बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख होते.तर प्रमुख उपस्थित म्हणुन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे चे अधिव्याख्याता डॉ. दीपक चांदुरे होते.तर सत्कारमूर्ती म्हणुन शिक्षक मनिष दिघेकर तसेच कै.माईसाहेब देशमुख प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा चंद्रशेखर देशमुख, संस्थेचे सचिव नरेंद्रराव देशमुख,संस्थेच्या सदस्या जयश्रीताई देशमुख उपस्थित होते.यावेळी कै भय्यासाहेब देशमुख स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शहापूर वरुड येथील गणित विषयाचे तज्ञ् शिक्षक मनिष दिघेकर यांना देण्यात आला.तसेच संस्था अंतर्गत पुरस्कार संस्थेची शाखा आदर्श विद्यालय जवळा शहापूर येथील शिक्षिका अर्चना झापर्डे यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेच्या सर्व शाळामधून प्रविण्यप्राप्त विद्यार्थी राजेश्वरी लेवटकर,सोहम ठाकरे,परमिता मोटघरे,श्रेया इंगळे,रोशन गाडगे,जानवी रघुवंशी,स्मित कापसे आदी विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व विविध बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना मनिष दिघेकर यांनी शिक्षकांची जबाबदारी ही राष्ट्र घडवण्याची असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सर्व अतिथीचा सत्कार अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला निमंत्रित,गावकरी,पालक मंडळी व युवक मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाष्कर काळे यांनी सूत्रसंचलन डॉ तुषार देशमुख आभार सूचिता फुटाणे यांनी मानले यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.












