चांदुर बाजार / प्रति:-
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित राज्यस्तरीय गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता साठी श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था संचालित शंकर विद्यालय तळवेल ची निवड झाली आहे वर्षभरातील स्वच्छता या विषयावर आधारित उपक्रम स्वच्छता गृह पाणी व्यवस्थापन या विषयाला धरून उपक्रम यांचे आयोजन शंकर विद्यालयच्या वतीने करण्यात आले होते राज्यभरातून 46 शाळांची निवड या अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली आहे या मध्ये अमरावती जिल्ह्यातील शंकर विद्यालयची निवड झाली आहे शाळेतील राष्ट्रीय हरित सेने मार्फत पूर्णामाय स्वच्छता व निर्माल्य संकलन अभियानाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते याची दखल सुद्धा फाउंडेशन ने घेऊन शाळेची निवड केली आहे याचे परीक्षण करण्यासाठी फाउंडेशन ची टीम एप्रिल मध्ये येणार आहे याकरिता स्पर्धा समन्वयक डॉ तुषार देशमुख,मुख्याध्यापक श्री दि.बा वानखडे सौं सुचिताफुटाणे यांचेसह सर्वशिक्षक विद्यार्थी व कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत
