राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण
************
@ म. फुलेंनी साजरी केलेली शिवजयंती सणासारखी साजरी करा — करणसिंग राजे बांदल
@ आपले आदर्श प्रतिगामी पळवत आहे . वेळीच रोखा — संमेलनाध्यक्ष रवी भाऊ मानव
@ भगव्या फेट्यांच्या आत छत्रपतींचा खरा विचार
घुसवा — स्वागताध्यक्ष भाष्करदादा टोंपे
@ छत्रपतींच्या इतिहासातून विकास सूत्र घेतले
पाहिजे — अविनाश कोठाळे
@ संमेलनात पारित राजकीय ठरावांना माजी मंत्री
बच्चुभाऊ कडू यांचे जाहीर समर्थन
चांदुर बाजार/प्रतिनिधी :-







छत्रपती शिवराय विचार कृती संमेलन मोठया उत्साहात चांदुरबाजार येथील गो सी टोम्पे महाविद्यालय येथे संपन्न झाले.
यावेळी संमेलन अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल मोझरी चे संचालक श्री रवी मानव होते.उद्घाटक म्हणून मा.राज्यमंत्री बच्चू कडू,उद्घाटन समारंभाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून वीर कृष्णाजीराजे नाईक बांदल यांचे वंशज करणसिंग राजे बांदल व समशेर बहाद्दर वीर कोयाजीराव बांदल यांचे वंशज अक्षयराजे बांदल होते. स्वागताध्यक्ष गी.सी.टोम्पे महाविद्यालय ट्रस्ट अध्यक्ष भास्कर टोम्पे, विशेष उपस्थितांमध्ये जिजाऊ बँक अध्यक्ष अविनाश कोठाळे ,होते.तर
प्रमुख उपस्थितांमध्ये जिजाऊ ब्रिगेड प्रदेश संघटिका प्रा मनाली तायडे जिल्हाध्यक्ष डॉ अंजली जवंजाळ, युवा नेते रविराज देशमुख आयोजन अध्यक्ष पंकज आवारे मुख्याध्यापक संघांचे सतीश सुरडकर राहुल गवई, नायब तहसीलदार तिवारी अधीक्षक पाटील उपस्थित होते
छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वर्तमान समाजाला गरज या विषयावर संमेलनाअध्यक्ष रवि मानव यांचे व्याख्यान झाले.यावेळी व स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ.तुषार देशमुख हे उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील उपस्थित विजेते यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी बांदल बंधू यांना मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.भाष्कर टोम्पे यांनाही माणपत्र देऊन गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे विशाल मोहोड,प्रितेश वाघमारे,चंदू तरारे,रिद्धेश ठाकरे,सतीश सुरडकर पंकज उईके यांचा ही सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला राज्यभरातील स्पर्धक व पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवीचौधरी प्रस्तविक डॉतुषारदेशमुख यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. तुषार देशमुख ,निखिल काटोलकर,रिद्धेश ठाकरे सुमित रिठे अजित काळबांडे अजय इंगळे प्रतिक देशमुख वैभव काळे सह सर्व आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले
