प्रतिनिधी……दि 4 ते 7 एप्रिल 2025 ला बंगलोर येथे होणाऱ्या सिनियर राष्ट्रीय डॉजबॉल महिलांच्या स्पर्धेमध्ये अमरावतीच्या वनवासी कनिष्ठ महाविद्यालय ,चिखलदरा कु.तृष्णा आगळेकर,कु अंशिका दिवाण तर तक्षशीला महाविद्यालयाची कु श्रावणी लोणारे व स्कुल ऑफ स्कॉलर धामणगाव रेल्वेची कु स्वस्तिका पौळ यांची महाराष्ट्र राज्याच्या डॉजबॉल संघामध्ये निवड झालेली आहे.उल्लेखनिय बाब म्हणजे अमरावती जिल्ह्याचा महिला संघ राज्य अजिंक्यपद डॉजबॉल स्पर्धेत सतत विजेता असतो.त्यामुळे वरील खेळाडूचे अमरावती शहरात सर्वत कौतुक होत असून त्यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे,महासचिव महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्या प्रशिक्षणात अनेक डॉजबॉल चे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले.त्यांचे डॉ.वसंत लुंगे,डॉ.आर.सी.कपिल,डॉ.सुरेश विधळे,सौ.अर्चना लुंगे,डॉ.हरीश काळे,श्री. अशोक खंडारे,श्री विशाल पोळ,श्री अतुल पडोळे,श्री आनंद उईके,श्री प्रफुल गाभने, श्री अपूर्व ढोरे,श्री संतोष कीटूकले,श्री आशिष ढोके, श्री हेमंत देशमुख इत्यादींनी अभिनंदन केले.
