चांदुर बाजार | प्रति :-
शेतकरी संघटनेच्या झंजावातात आयुष्य झोकून दिलेले, सर्वपरिचीत नंदकुमार बंड यांच्या निधनाने चांदर बाजार तालुक्यातील वैचारिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर मोठा आघात झाला . अल्पशा आजारात त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रातील जुनी जाणती सर्व शेतकरी चळवळ शोकाकुल झाली . शरद जोशी यांच्या चळवळीतून पुढे आलेल्या नंदुभाऊंनी, आपल्या राजकीय जीवनात अनेक वळणवाटा पहिल्या . अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, राष्ट्रवादी कॉग्रेस, शरद किडा व सांस्कृतिक चळवळ या माध्यमातून ते महाराष्ट्राला परिचीत होते .
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर पुणे येथे वैद्यकीय उपचार घेत असतांना अचानक त्यांचेवर मृत्युने घाला घातला . त्यांचे पार्थीव पैतृक गाव खरवाडी येथे आणण्यात आले . त्यावेळी हजारो चाहत्यांनी आणि राजकीय / सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले . त्यांच्या पार्थीवावर हजारो शोकाकुल जनतेच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले .
यावेळी कन्या कु . साक्षी आणि खुशी यांनी अग्नीडाग दिला .
शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शोकसभेत, माजी महापौर विलास इंगोले, श्रीकांत तराळ, संतोष महात्मे, विजय विल्हेकर,प्रेमकुमार बोके, भैय्यासाहेब मेटकर, गणेश हलकारे, भक्तीधामचे अध्यक्ष रवी इंगोले , कस्तूरबा आश्रमचे अध्यक्ष प्रदीप चौधरी, रविभाऊ संगेकर,जगदीश बोन्डे,लक्ष्मीकांत खाबिया मुरलीधर डहाणे इत्यादींनी
आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्याशोकसभेचे संचलन डॉ तुषार देशमुख यांनी केले.




