( स्मशान होलिकोत्सवात वक्ते प्रा. प्रविण देशमुख )
———————–
चांदूर बाजार/प्रति :-
जीजाऊ मॉ साहेबांच्या आदेशाने , शापीत जमीन नांगरून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे शहर उभारले . हा अंधश्रद्धेच्या छाताडावरचा पहिला हल्ला होता . असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रा. प्रविण देशमुख यवतमाळ यांनी केले . येथील स्मशान भूमित आयोजीत लोकजागर स्मशान होलीकोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते . चांदूर बाजार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा उपक्रम श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील भेद स्पष्ट करणारा असल्याचेही ते म्हणाले .
छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर ते बोलत होते . गौतम बुद्धांनी अत दिप भव म्हटले आणि वेदांनिही अहं ब्रम्हासमी म्हणत स्वयंज्ञानाला अर्थात चिकीत्सेला महत्व दिले . तोच मार्ग संतांनी भक्तीमार्गात रुढ केला . पण आपण बागेश्वर आणि प्रदीप मिश्रांच्या मागे धावत सुटलो . त्यामुळे आता आपली ऊलटी गीनती सुरू झाली आहे . पूर्वीची सत्ता खिसे कापत होती . आता तर मेंदूलाच गुलाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे . अशा वेळी बुद्धिवाद्यांनी बधीरता येऊ न देता जागृत राहावे . असे आवाहनही त्यांनी यावेळी केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भक्तीधाम या आध्यात्मिक संस्थेचे सचिव सतीशराव मोहोड हे होते . तर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोषराव किटूकले , काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किशोरभाऊ देशमुख यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संघटक ज्ञानेश्वर डवरे यांनी अंनिसचा देवाधर्माला विरोध नसल्याचे सांगीतले . कु.वैदेही गजानन कडू या इ. 8 वी च्या शाळकरी विद्यार्थीनिने केलेले प्रभावी संचलन कुतूहल वाटणारे होते . महानुभाव संप्रदायाचे पायीक असलेल्या सुभाषराव घोरमाडे यांचा यानिमीत्ताने स्मशान भूमीत वाढदिवस साजरा झाला . ही सुद्धा क्रांतीकारी बाब होती .
कार्यक्रमाचे हे सहावे वर्षे असून दरवर्षी महिलांची उपस्थिती ही लक्षणीय बाब आहे . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष डॉ. तुषार देशमुख यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोदभाऊ कोरडे , पंकजदादा आवारे , प्रमोदभाऊ ठाकरे, नितीन देशमुख , सुनिल पापळकर , सुनिल आकोलकर , संजय पाटील , संतोष कोठाळे , निलेश चारथळ , संजय राऊत , प्रभाकरराव खोपे , मंगेश चौधरी , सतीश गुजरकर , आर के देशमुख , गजानन कडू , नंदकिशोर रोकडे , प्रकाशराव भालेराव , निलेश कडू , प्रमोद राऊत , सुरेंद्र पवार , सुनिल तायडे , दिपक महल्ले , प्रा गजानन देशमुख , धिरज राणे , उदय देशमुख ,संजय बागडे , प्रशांत म्हसके , सुभाष पटवर्धन , गजानन ठाकरे , राजेंद्र सोनवणे , प्रा प्रशांत देवतळे , राजेश लेंडे , रविभाऊ कोंडे , प्रदीप कोल्हे , सुरेंद्र खाजोने , संजय (बाबा ) देशमुख इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .
