राज्यभरातून प्रतिनिधी होणार सहभागी
**************
घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे होणार बक्षीस वितरण
**************
चांदुर बाजार/प्रतिनिधी :-
आम्ही सारे शिवप्रेमी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने राज्यस्तरीय छत्रपती शिवराय युवा विचार कृती संमेलनाचे आयोजन यावर्षी चांदुर बाजार येथील गो.सी टोम्पे महाविद्यालय येथील संत नामदेव महाराज सभागृहात मंगळवार 18 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पासून करण्यात आले आहे हे संमेलनाचे तिसरे वर्ष आहे.यावर्षी संमेलनच्या अध्यक्षपदी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक तथा श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल चे संचालक रविदादा मानव यांची निवड करण्यात आली आहे या संमेलनाचे उदघाटन माजी राज्यमंत्री तथा शेतकरी नेते बच्चू कडू करणार असून उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ देशमुख तळवेलकर राहतील.या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे पवनखिंड चे वीर बांदल घराण्यातील वंशज करणसिंह राजेबांदल व अक्षयराजे बांदल उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थित म्हणुन जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक प्रीती देशमुख,जेष्ठ पत्रकार राजाभाऊ माने उपस्थित राहणार आहे.या संमेलनाचे स्वागतध्यक्ष म्हणुन गो.सी टोम्पे महाविद्यालय ट्रस्ट चे अध्यक्ष भाष्कर दादा टोम्पे असतील या यावेळी उदघाटन कार्यक्रमानंतर परिसंवाद होणार असून या मध्ये सुप्रसिद्ध वक्ते प्रा प्रेमकुमार बोके,प्रा प्रवीण देशमुख आपले विचार व्यक्त करणार आहेत अध्यक्षस्थानी प्रा.गजानन देशमुख असतील यावेळी तहसीलदार रामदास शेळके,पोलीस निरीक्षक संतोष टाले,गटविकास अधिकारी नारायण आमझरे यांची प्रमुख उपस्थिती असेल या कार्यक्रमात विविध व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार असून राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट बक्षीस वितरण करण्यात येणार आहे याचवेळी राज्यस्तरीय वीर भगतसिंह स्मृती सन्मान यवतमाळ येथील सुप्रसिद्ध वक्ते तथा अभ्यासक प्रा. प्रवीण देशमुख यांना देण्यात येणार आहे तरी या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष पंकज आवारे,मुख्य संयोजक डॉ तुषार देशमुख, निमंत्रक प्रा प्रेमकुमार बोके,जिजाऊ ब्रिगेड प्रदेश अध्यक्षा सीमाताई बोके,राज्य संघटिका प्रा मनाली तायडे,हर्षा ढोक,डॉ अंजली जवंजाळ,निखिल काटोलकर,शरद काळे आयोजन समिती अध्यक्ष पंकज आवारे, नितीन देशमुख, गजानन ठाकरे, संतोष कोठाळे,प्रमोद ठाकरे, ज्ञानेश्वर डवरे मंगेश चौधरी आदीसह आयोजन समितीने केले आहे.
