कॉ.पंकज आवारे यांचे प्रतिपादन
———————–
एकूण 103 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
———————–
प्रतिनिधी | तळवेल :-



शंकर विद्यालय तळवेल येथे जिजाऊ बुक बँक अंतर्गत जिजाऊ विद्यार्थी प्रोत्साहन अभियानात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संत गुलाबराव महाराज भक्तीधाम संस्थेचे संचालक पंकज आवारे यांनी विद्यार्थी सर्वांगीण विकास बघणाऱ्या उपक्रमाचे वआयोजकांचे भरभरून कौतुक केले व हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.संत गुलाबराव महाराज जयंती,बाबासाहेब मोहोड जयंती व शिक्षणरत्न गो अ देशमुख स्मृतिदिन निमित्त जिजाऊ विद्यार्थी प्रोत्साहन अभियानाचे आयोजन शंकर विद्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रमुख उपस्थित म्हणुन जिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका शुभांगी चरपे,शाळा समिती सदस्य श्रीधर भोकसे,राम गेडाम शेषस्मृती क्रीडा मंडळ उपाध्यक्ष कॅप्टन वैकुंठराव वानखडे,जि प मराठी शाळेचे मुख्यध्यापक मंगेश वाघमारे,शंकर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक भाष्कर काळे,जिजाऊ बुक बँकेचे संचालक तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉ तुषार देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक शिक्षणरत्न गो अ देशमुख यांच्या कार्याचे स्मरण यावेळी उपस्थितांनी केले.यावेळी शंकर विद्यालय,जि प प्राथमिक शाळा तळवेल व बऱ्हाणपूर येथील 103 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी पूर्णामाय स्वच्छता अभियानातील सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता फुटाणे,प्रास्ताविक भाष्कर काळे तर आभार डॉ तुषार देशमुख यांनी केले.
