राज्यातून तिसराक्रमांक मिळवला


प्रतिनिधी/….गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था संचलित शंकर विद्यालय तळवेल चा राज्यातून ग्रामीण विभागातून तिसरा क्रमांक आला आहे.एकवीस हजार रुपये रोख सन्मानचिन्ह,सन्मानचिन्ह असे पुरस्कार चे स्वरूप होते जळगाव येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती म्हणुन जैन समूहचे विश्वस्त अशोक जैन,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कारणवाल,सागर मित्र चळवळीचे विनोद बोधनकर,राज्य सल्लागार परिषदेचे सल्लागार किशोर बोरनारे,अंबिका जैन, स्पर्धेचे मुख्य समन्वयक गिरीश कुलकर्णी आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी या स्पर्धेचे समन्वयक डॉ तुषार देशमुख यांनी हा सन्मान शाळेच्या वतीने स्वीकारला. हा पुरकार शाळेने कुरळ पूर्णा येथील नदीपात्रात राबवलेल्या पूर्णामाय स्वच्छता व निर्माल्य संकलन अभियानामुळे व वर्षभर राबवलेल्या उपक्रमामुळे मिळत असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,सचिव नरेंद्रराव देशमुख,सदस्या जयश्रीताई देशमुख, रविराज देशमुख, माजी मुख्याध्यापक डी बी वानखडे, प्रभारी मुख्याध्यापक भाष्कर काळे,स्पर्धा समन्वयक तथा पूर्णामाय अभियानाचे संयोजक डॉ तुषार देशमुख,जेष्ठ शिक्षिका सुचिता फुटाणे, विजय पांडे, प्रिया देशमुख, कविता देशमुख ,माया मंगळे कर्मचारी गजानन साबळे तसेच पूर्णामाय स्वच्छता अभियानाचे समन्वयक प्रतीक देशमुख सदाशिव देवताळे यांच्यासाह गावकरी मंडळी व पालक वर्गाने अभिनंदन केले आहे.
