.


मस्साजोग जि-बीड येथील सरपंच स्व. संतोषअण्णा देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीची आज 15 जुन रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्यातील उपस्थिती सर्वांसाठीचं लक्षवेधी ठरली.सन्मान सोहळ्याचं आयोजन करणाऱ्या डॉ भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख समाजसेवी संस्था अमरावती यांच्या वतीनं वैभवीन हृदय पिळवटून टाकणाऱ्या वेदनेवरही मात करून मिळविलेल्या यशाबद्दल माजी मंत्री यशोमतीताई ठाकुर यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.
डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख बहुद्देशिय समाजसेवी संस्था अमरावती च्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व कौतुक सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मस्साजोग जि. बिड येथील दिवंगत सरपंच स्व .संतोषअण्णा देशमुख यांची कन्या कु. वैभवी देशमुख हिने इयत्ता बारावीत तसेच NEET परीक्षेत भरगोस यश प्राप्त केल्यामुळे तिचा विशेष सत्कार सोहळा देखील यावेळी पार पडला…
याप्रसंगी वैभवीने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या झाल्यानंतर कशी विदारक परिस्थिती निर्माण झाली. याविषयी अतिशय भावुक मनोगत व्यक्त करतांना कोणतही संकट तुम्हाला प्रगतीपासून रोखू शकत नाही हा लाखं मोलाचा संदेश उपस्थित विद्यार्थ्याना देत गेल्या काही महिन्यातील अनुभव विषद करताना, वैभवी एक,एक अनुभव मांडत होती अन् तिच्या या दाहक अनुभवाने अख्या सभागृहात विलक्षण नीरव शांतता आणि अंगावर काटा आणणाऱ्या तिच्या एक,एक शब्दाने प्रत्येकजनाच्या नेत्रकडा ओलावल्या होत्या. एखाद्या भयंकर संकटातून होरपळून निघाल्यानंतर अगदी लहान वयातसुद्धा कोवळ मन किती प्रगल्भ होत याची अनुभूती देण्यासोबतच कोणत्याही क्षणी अश्रूंचे बांध फुटतील असा हा प्रसंग होता.
वडिलांच्या निर्घृण हत्येनंतर सुद्धा वैभविने इयत्ता बारावीच्या परिक्षेतचं नव्हेतर नीट परीक्षेत सुद्धा यश संपादन केलं. याविषयी ती म्हणते मला माझ्या बाबांचं सप्न पुर्ण करायचय. त्यासाठी मी हा संघर्ष करते आहे. पण याचं वेळीं बाबा नाहीत यावर माझा विश्वास बसतं नाहीये. कारणं उपस्थित सर्व पालकांमध्ये मी पण माझे”बाबा”शोधतेय.या तीच्या एका वाक्यंन तीच्या हृद्यात अजुनही सुरू असलेली घालमेल, सैरभर मन अन् अंतर्मनातील ज्वालामुखी सारखा धगधगनारा प्रचंड आक्रोश उपस्थितांच हृदयाचा वेध घेणारा होता.
