दिनांक 11 ते 15 मे दरम्यान पटना (बिहार) येथे 18 वर्षी खालील (मुले व मुली) खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी दिनांक 22/23 April 2025 रोजी नागपुर( Mankapur Stadium NAGPUR) येथे ठेवण्यात आलेली आहे.
या निवड चाचणीमध्ये अमरावती जिल्हय़ाच्या खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा (मुले व मुली) शनिवार दि. 19/4/2025 ला सकाळी 8:00 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख विधीमहाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेली आहे. तरी अमरावती जिल्ह्य़ातील शाळा व महाविद्यालयातील सर्व खेळाडूंनी अधिक माहितीसाठी डॉ.हनुमंत लुंगे (9423424950), श्री आनंद उइके(9890985203) यांच्याशी संपर्क करावा.
निवड चाचणी साठी येणाऱ्या सर्व खेळाडूंनी आपल्या सोबत आधार कार्ड व २ पासपोर्ट फोटो जन्म दाखला घेऊन यावें.
