अभिनव स्पर्धेचे 11 वे वर्ष…….राज्य जिल्हा व तालुका स्तरावर बक्षीस मिळणार !
आम्ही सारे शिवप्रेमी, क्षात्रवीर संभाजी महाराज क्रीडा व युवक प्रतिष्ठान आयोजित व जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व युवराज संभाजी राजे मित्र मंडळ संयोजित राज्यस्तरीय संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ड ग्रेटेस्ट रेकॉर्डमध्ये या स्पर्धेची नोंद असून स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे. दि १९,२० व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय प्रथम बक्षीस २१००० रुपयांचे असून जिजाऊ बँक व आयोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस ११००० रुपये असून हॉटेल व-हाडी बैठक, परतवाडा यांचेकडून देण्यात येणार आहे. तृतीय बक्षीस ५००० रुपयांचे असून हॉटेल स्वामी, चांदूरबाजार यांचे कडून देण्यात येणार आहे. चतुर्थ बक्षीस २५०० रुपये असून जिजाऊ फोटो आर्ट्स, चांदुर बाजार यांच्या सहकार्याने देण्यात येणार आहे. तर ११००० रुपयांची विशेष प्रोत्सांहनपर बक्षिसे कै इंजि. सचिनदादा चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आहे. या स्पर्धेची संकल्पना तथा मुख्य संयोजक डॉ. तुषार देशमुख मो ९७३००१५८९९ आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ तुषार देशमुख यांनी केले आहे. स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जीवनातील एक प्रसंग किंवा पावनखिंड या विषयाचा या वर्षीच्या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व मावळ्यांनी आपल्या घरी शिवरायांच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन करून आकर्षक व नाविन्यपूर्ण सजावट दिनांक १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान करावी. सजावटीचे कोणतेही तीन फोटो आपल्या कुटुंब, शेजारी व मित्रमंडळी सह काढून संयोजकाच्या व्हाट्सअप नंबर वरती पाठवावे. त्यात आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर टाकावा. उत्कृष्ट अशा सजावटीचे परीक्षण करण्यासाठी तीन दिवसात परीक्षक आपल्या घरी येतील. या स्पर्धेकरिता अ गट वय वर्ष ५ ते १६ व ब गट वय वर्ष १७ ते ३० अशा दोन गटात मावळ्यांना सहभागी होता येईल. राज्यस्तरावर उत्कृष्ट आठ स्पर्धकांना अ व ब अशा दोन गटात विभागून सर्व बक्षीसे देण्यात येतील. गुणांकन हे विषयाची मांडणी, कौटुंबिक सहभाग, वेशभूषा, सामाजिक संदेश, प्रचार प्रसाद व मागील वर्षाचा सहभाग या मुद्द्यांवर आधारित असेल असे संयोजन समितीच्या सीमाताई बोके, प्रा विजय देशमुख, प्रा मनालीताई तायडे, डॉ हर्षा ढोक, डॉ अंजली जवंजाळ,निखिल काटोलकर, रिद्धेश ठाकरे, अजय इंगळे, ज्ञानेश तुरखडे, अक्षय पांडे, मृत्युंजय आवारे, श्रेयस बर्वे यांनी केले आहे अशी माहिती समितीचे संतोष शेंडे प्रसिद्धीप्रमुख यांनी दिली आहे.










