.
चांदूर बाजार : अखिल तालुका शिव जयंती महोत्सव समिती, कै. सुमनबाई न. हर्डे बहुउद्देशीय संस्था व गो. सी. टोम्पे महाविद्यालय चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती व ३५६ वा शिवजयंती सोहळा वर्षाच्या पार्श्वभूमीवर तालुका स्तरीय शिव जयंती वक्तृत्व स्पर्धा २०२६ चे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता संत नामदेव सभागृह, गो. सी. टोम्पे महाविद्यालय, चांदूर बाजार येथे आयोजित करण्यात आली आहे. हे स्पर्धेचे 5 वे वर्ष आहे.या निमित्ताने चांदूर बाजार मध्ये शिव विचारांचा जागर होणार आहे.
तालुका स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून शिव स्पर्धेकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये शिव विचारांची रुजवणूक होऊन एक संस्कारक्षम विद्यार्थी निर्माण व्हावा या करिता गेल्या ५ वर्षांपासून शिव वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी स्पर्धेचे विषय स्वसंरक्षण, स्वावलंबन आणि आत्मनिर्भर भारत : शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन, पर्यावरण संरक्षण आणि गडकोट : शिवरायांचे दूरदर्शी विचार, धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्म समभाव : शिवाजी महाराजांचे राज्यकारभार,लढायां पलीकडचे छत्रपती शिवराय हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.
दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर वर्ग ४ ते १० वी च्या विद्यार्थ्यांना ५ मिनिटांत आपले विचार व्यक्त करायचे असून वर्ग ७ ते १० च्या गटातील विजयी स्पर्धकांना प्रथम बक्षीस १००० रु. रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय बक्षीस ५०० रु. रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय बक्षीस ३०० रु. रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तर इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ. तुषार देशमुख, संयोजक, अखिल तालुका शिवजयंती महोत्सव समिती यांनी केले असून अधिक माहितीसाठी डॉ. तुषार देशमुख (९७३००१५६९९), प्रा. मयूर चौधरी संयोजक ता. शिव वक्तृत्व स्पर्धा (७७९८०६०५००), निखिल काटोलेकर समन्वयक ता. शिव वक्तृत्व स्पर्धा (९३०७५७६७४२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.










