सुमारे १००० मावळ्यांनी घेतला सहभाग




दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही सारे शिवप्रेमी , क्षात्रवीर संभाजी महाराज क्रीडा व युवक प्रतिष्ठान आयोजित व जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व युवराज संभाजी राजे मित्र मंडळ संयोजित राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वर्ड ग्रेटेस्ट रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या या स्पर्धेस दरवर्षी स्पर्धकांचा सहभाग वाढत असून यंदा अकरावे वर्षात सुमारे १००० मावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. दि १९,२० व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित स्पर्धेत अमरावती, बुलढाणा, मुंबई, रत्नागिरी, लातूर, वर्धा, जालना या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यातून मावळे सहभागी झाले होते. त्याबद्दल संयोजकांनि स्पर्धकांचे आभार व्यक्त केले आहे. या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय प्रथम बक्षीस २१००० रुपयांचे असून जिजाऊ बँक व आयोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस ११००० रुपये असून हॉटेल व-हाडी बैठक, परतवाडा यांचेकडून देण्यात येणार आहे. तृतीय बक्षीस ५००० रुपयांचे असून हॉटेल स्वामी, चांदूरबाजार यांचे कडून देण्यात येणार आहे. चतुर्थ बक्षीस २५०० रुपये असून जिजाऊ फोटो आर्ट्स, चांदुर बाजार यांच्या सहकार्याने देण्यात येणार आहे. तर ११००० रुपयांची विशेष प्रोत्सांहनपर बक्षिसे कै इंजि. सचिनदादा चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहिर करण्यात येईल व त्या नंतर भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असल्याचे राज्य स्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा या स्पर्धेची संकल्पना तथा मुख्य संयोजक डॉ. तुषार देशमुख यांनी सांगितले आहे. स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जीवनातील प्रसंग आणि पावनखिंड या विषयांना धरुन स्पर्धकांनी आकर्षक देखावे व सजावटी साकारल्या होत्या.शिवजयंतिनिमीत्त आयोजित या स्पर्धेतून शिवरायांची ऊर्जा, त्यांचे विचार आणि त्यांची प्रेरणा प्रत्येकाच्या हृदयात कोरण्याचा प्रयत्न व आदर्श समाज घडविण्यासाठीचे पाऊल असल्याचे संयोजन समिती चे सीमाताई बोके,मनालीताई तायडे,प्रा विजय देशमूख,निखिल काटोलकर,ज्ञानेश तूरखेडे,श्रेयश बर्वे,मृत्युंजय आवारे,अजय इंगळे,रिद्धेश ठाकरे आदिनी म्हटले आहे










